🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

'आरक्षण उपवर्गीकरण समर्थक समिती 'ची स्थापना

 आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर सामाजिक ऐक्याला तडा जावू द्यायचा नाही- प्रकाश वायदंडे यांचे आवाहन


कराड प्रतिनिधी | दि.२६ , चांगभलं वृत्तसेवा


आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर कोणत्याही परिस्थितीत सामाजिक ऐक्याला तडा जावू द्यायचा नाही असे आवाहन दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी कराड येथे प्रमुख कार्यकर्त्यांचे बैठकीचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
बैठकीस बहुजन समता पार्टीचे राम दाभाडे,मार्गदर्शक सुरेश बडेकर (आप्पा), वक्ते रामभाऊ सातपुते,मुक्ता फौंडेशनचे संजय तडाखे,माहिती अधिकार कार्यकर्ते प्रितम हातेकर,माजी जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते,मधुकर मोरे,हरी बल्लाळ,आण्णा पाटसुपे,सुरज घोलप,निलेश केंगार,विजय वायदंडे,ॲड. स्वप्निल भिसे,कृष्णत तुपे,ॲड. अजित साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण 'अबकड ' या विषयास समाजातील काही लोक गैरसमजातून विरोध करीत असून आमची लढाई हक्काची,सामाजिक न्यायाची आणि समतेची आहे.त्यामुळे जर गैरसमजातून विरोध होत असेल तर लोकशाहीमार्गाने रस्त्यावर यावे लागणार आहे.
आपण जास्तीत जास्त लोकांसमोर जावून आरक्षण उपवर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचा कार्यक्रम घेणार आहे.
तसेच आरक्षण उपवर्गीकरण होण्यासाठी गांवोगावी मातंगआणि इतर आरक्षण लाभापासून वंचित अनुसूचित जातीमधील काही घटकांकडे जावून 'जागृती अभियान 'राबविण्यात येणार तसेच भारतीय जनगणना संदर्भात अभियान राबविणार असल्याचे प्रकाश वायदंडे यांची सूचित केले.
बैठकीत' आरक्षण वर्गीकरण समर्थक समिती,सातारा ची स्थापना करण्यात आली.प्रास्ताविक रमेश सातपुते यांनी केले तर कराड तालुकाध्यक्ष जयवंत सकटे यांनी आभार मानले.

➖➖➖➖➖➖➖➖➖

#SataraNews #KaradNews #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या