कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड दक्षिण मांड रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत काले परिसरातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आदर्श उपक्रम राबविला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये भर पडली असून, स्थानिक स्तरावर क्लबच्या कार्याचे कौतुक होत आहे.
कराड दक्षिण विभागात नव्याने स्थापन झालेल्या या रोटरी क्लबकडून सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काले येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये ई-लर्निंग संच, ग्रंथालयासाठी कपाटे, संगणक, टीव्ही संच, फॅन, खुर्च्या तसेच विद्यार्थ्यांसाठी बेंचेस यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साधनांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष निळकंठ देसाई यांनी काले जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला दोन टेबल व दोन कपाटे, तर जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेस पाच टेबल, पाच फॅन तसेच वॉल फॅन उपलब्ध करून दिले. याशिवाय संजयनगर येथील प्राथमिक शाळेस ४३ इंची स्मार्ट टीव्ही संच भेट देण्यात आला. या साहित्याच्या खरेदीसाठी आयडीबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून आर्थिक मदत मिळाली.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव रमेश बागल, सदस्य विकास देसाई, शंकर पाटील, अमित कुंभार, भरत पाटील, सतीश देसाई, जयवंत देसाई, विकास पाटील, गणेश देसाई, सज्जन साळुंखे, संभाजी यादव, संदीप टकले, सचिन देसाई यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीला पाटील, संजयनगर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पाटील, उपशिक्षिका सौ. कल्पना देशमाने, सौ. मनीषा शिंगारे, सौ. मधुमालती लिपारे, प्रियंका लोखंडे यांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र थोरात यांनी प्रास्ताविक केले, तर विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#Kale #कालेकर #दक्षिणमांडरोटरीक्लब #कराडदक्षिण
#चांगभलंन्यूज #ChangbhalaNews

0 टिप्पण्या