🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा कारखान्याकडून वाकुर्डे योजनेच्या थकीत वीजबिलापोटी ३ लाख अदा

 डॉ. सुरेश भोसले यांचा पुढाकार; ३ लाखांचा धनादेश योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

उंडाळे विभागातील अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. थकीत वीजबिलापोटी ३ लाख रूपयांचा चेक पेठ नाका (ता. वाळवा) येथील वाकुर्डे योजनेच्या अधिकाऱ्यांकडे आज सुपूर्द करण्यात आला.

कराड तालुक्यातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. पण या योजनेचे वीज बिल थकीत असल्याने या भागातील लोकांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल कृष्णा कारखान्यामार्फत अदा करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेत, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार थकीत विजबिलाचा ३ लाखांचा धनादेश वारणा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार व सहाय्यक अभियंता विजय आंबोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी विविध गावातील स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत, डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार मानले.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, नांदगावचे सरपंच हंबीरराव पाटील, सवादेचे माजी सरपंच संजय शेवाळे, पंकज पाटील, तानाजी चौरे, उपसरपंच घोगाव एन डी शेवाळे, दत्तात्रय साळुंखे, दिलीप सूर्यवंशी, प्रवीण साळुंखे, सुमित शेवाळे, अशोक पाटील उंडाळे, टाळगावचे सागर जाधव, धनाजी देशमुख, भीमराव पाटील, दिनकर पाटील यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #Kale #ChangbhalaNews

#वाकुर्डेयोजना #कृष्णासाखरकारखाना #दक्षिणमांडनदी

#चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या