🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडमध्ये हॉकर्सचा लढा ; पुनर्वसनाच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड शहरातील हॉकर्स धारकांच्या न्यायासाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. पालिका आवारातील स्व. पी. डी. पाटील साहेब यांच्या स्मारकाजवळ सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ या वेळेत उपोषण करण्यात आले. योग्य न्याय मिळेपर्यंत दररोज दोन कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी कराड नगरपालिकेकडून राबविण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत शहरातील हातगाडे हटवण्यात आले होते. मात्र हॉकर्सना ओळखपत्र देणे व त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करणे हा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने हॉकर्स संघटना आक्रमक झाली आहे. “आधी योग्य ठिकाणी पुनर्वसन, मग अतिक्रमण मोहीम” अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.

या पार्श्वभूमीवर कराड शहर हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांच्यासह अनेक सदस्यांनी उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनादरम्यान मुख्याधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रशासनाने १० दिवसांच्या आत हॉकर्सना जागा ताब्यात देणे व ओळखपत्र देण्याचे आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी बांधकाम सभापती अख्तर आंबेकरी, पाणीपुरवठा सभापती आल्ताफभाई शिकलगार, विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर तसेच संघटनेचे आनंदराव लादे, हरीश बल्लाळ, क्रांतिकुमार मोरे, गजानन कुंभार, राजू कांबळे आदी उपस्थित होते.
आल्ताफभाई शिकलगार व अख्तर आंबेकरी यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषणकर्ते जावेद नायकवडी यांचे उपोषण सोडविण्यात आले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #KaradCity #Karadkar

#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या