🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सातारा-सांगलीसह राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृह विभागाचा आदेश

 निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक



कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने च्या गृह विभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी काढण्यात आलेल्या या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार तुषार दोशी यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदावरून सांगली येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निखिल पिंगळे यांची सातारा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच संदीप घुगे यांची सांगलीवरून बदली करून त्यांना मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) म्हणून नेमण्यात आले आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली असून, त्यांना अतिरिक्त जबाबदारी (चार्ज) देण्यात आला आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे, तर एस. मेहरा यांची गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय महेश रेड्डी यांची जळगाववरून पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली असून, श्रीकांत धिवरे यांची जळगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच पुणे येथील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
गृह विभागाच्या या आदेशामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठे बदल झाले असून, नव्या अधिकाऱ्यांकडून संबंधित जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#PoliceTransfer #MaharashtraPolice #SataraNews #SangliNews #BreakingNews #ChangbhalaNews #MaharashtraUpdates #PoliceDepartment


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या