🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई; 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त, तिघे जेरबंद

 


18.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; वारुंजी फाट्यावर सापळा रचून छापा कारवाई

चांगभलं प्रतिनिधी | कराड

कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा एकूण 18 लाख 82 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही जण वारुंजी फाटा परिसरात इनोव्हा वाहनातून मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत समीर गुलाब शेख (रा. कोयनावसाहत, कराड), नजर महम्मद आरिफ मुल्ला (रा. मुजावर कॉलनी, कराड) आणि फरदीन दादापीर शेख (रा. सूर्यवंशी मळा, कराड) या संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 2 लाख 87 हजार 340 रुपये किंमतीचे 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पोलिसांनी जप्त केले. तसेच तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कारही जप्त करण्यात आली.
याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, हवालदार वाडकर, पाटील, कुंभार, महिला पोलीस सांळुखे, हवालदार स्वामी, कोरडे, सांडगे, मोरे, देशमुख, पवार, महिला पोलीस पिसाळ, हवालदार विभुते, चव्हाण, मोमीन, साळुंखे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.


कारवाईतील ठळक बाबी...

🔹95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त.
🔹तिघा संशयितांना अटक.
🔹3 मोबाईल फोन व 1 इनोव्हा कार जप्त
🔹एकूण 18.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
🔹एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कराड #कराडकर #क्राईमन्यूज #कराडक्राईमन्यूज

#चांगभलं #चांगभलंन्यूज #साप्ताहिकचांगभलं

#चांगभलंसाप्ताहिक #कराडड्रगकारवाई #सातारापोलीस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या