‘सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद ; नामदेव पाटील (आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
चांगभलं प्रतिनिधी | वारुंजी-कराड
कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील (आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त वारुंजी (तालुका कराड) येथे आयोजित “सत्यजित केसरी पर्व 4 थे” या भव्य बैलगाडा शर्यत मैदानात 'पश्चिम महाराष्ट्र केसरी राजा' व 'संग्राम' हे बैल जोडी प्रथम क्रमांक पटकावून सुपरहिट ठरली.
या स्पर्धेत मध्यप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही बैलगाडा शर्यत संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये सौ. उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा पश्चिम महाराष्ट्र केसरी राजा व जगदाळे यांचा संग्राम ही जोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. किरण आप्पा कालगाव यांचा रैना व भीमगावकरांचा सावकार ही जोडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. पै. आनंदराव आप्पा रेठरेकर यांचा राजा व म्हारुगडे वाडीकरांचा मन्याभाई ही जोडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
तसेच सुजगावकरांचा बकासुर व दुर्गा, कालेढोणकरांचा चिंक्या-दहिगावकरांचा पाखऱ्या या जोड्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. गिरवीकरांचा माऊली व लोबोदकरांचा कृष्णा ही जोडी पाचव्या क्रमांकाची मानकरी ठरली. कोरेगावकरांचा भवाबी व पवार यांचा अवतार ही जोडी सहाव्या क्रमांकावर राहिली. तर पंढरीनाथ फडके यांचा रोमन व साखरवाडीकरांचा बावऱ्या ही जोडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली.
स्पर्धेचे समालोचन सुनील मोरे यांनी केले, तर झेंडापंच म्हणून सोमनाथ जगदाळे यांनी जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली. या बैलगाडा शर्यतीचे थेट प्रक्षेपण P.3 पवन यादव यांनी केले. विशेष म्हणजे तब्बल 6 लाख 40 हजाराहून अधिक प्रेक्षकांनी या शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण पाहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
या बैलगाडा शर्यत मैदानाला कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील आप्पा, बाळासाहेब पाटील आबा, अजितआप्पा पाटील चिखलीकर, गजानन आवळकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, सुनील पाटील, प्रा. धनाजी काटकर, प्रदीप जाधव, रवींद्र बडेकर, संभाजी चव्हाण, महादेव पाटील, नथुराम झिमरे, संदीप काकडे, सुरेश भोसले (आप्पा), हणमंत भोपते, विजय माने, शिवाजीराव जमाले, भिमराव जमाले, मुजीम ईनामदार, सुभाष चव्हाण, विश्वास निकम, राहुल पवार, अभिजीत पवार, राहुल काळोखे तसेच बैलगाडा शौकीन, नामदेव पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते, बैलगाडा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#बैलगाडाशर्यत #वारुंजी #वारुंजीमैदान #नामदेवपाटीलआप्पा
#चांगभलं #चांगभलंन्यूज #काँग्रेस #शर्यत #कराड #सातारा
#ChangbhalaNews

0 टिप्पण्या