चांगभलं वृत्तसेवा | कराड
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी कराड येथील इम्रान मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कराड येथे संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. इम्रान मुल्ला यांनी यापूर्वी संघटनेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
इम्रान मुल्ला यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलने उभारली आहेत. आत्मदहन आंदोलन, रस्ता रोको आंदोलन तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी राष्ट्रीयकृत बँकांना टाळे ठोको आंदोलन त्यांनी केले होते. नोकरभरती प्रक्रियेतील प्रश्नांबाबत त्यांनी बेमुदत प्राणांतिक उपोषणही केले होते.

0 टिप्पण्या