चांगभलं प्रतिनिधी | कराड
कराड शहरालगत सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामामुळे पाचवड फाटा ते वारुंजी फाटा दरम्यान दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. यामुळे वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताचीही शक्यता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन आज उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी कराड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवदास माने, कराड दक्षिण अध्यक्ष चैतन्य पाटील, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस सोशल मीडिया दिग्विजय जमाले, दक्षिण उपाध्यक्ष खालिद पटेल, मुकुंद पाटील, अवधूत पाटील, विक्रम पाटील, राम मोहिते, चिन्मय राठोड, वैभव जाधव, यश अडसूळ, रूद्राक्ष थोरात, प्रज्वल थोरात आणि प्रवीण पाटील उपस्थित होते.
... अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार ; देवदास माने
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पर्यायी वाहतूक व्यवस्था, सिग्नल नियोजन आणि वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी युवक काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष देवदास माने यांनी दिला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #महामार्ग #पुणे_बेंगलोर_महामार्ग #युवक_काँग्रेस
#काँग्रेस #कराडतालुका #देवदास_माने #चांगभलंन्यूज



0 टिप्पण्या