🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

चिंता मिटली ; कोयना धरण 81.81 टक्के भरले; आज सायंकाळनंतर विसर्ग वाढविला जाणार

 


चांगभलं प्रतिनिधी | पाटण | दि. 31 जुलै 2026

सातारा जिल्ह्यासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवार (31 जुलै) सकाळी 8.00 वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी 2,148.00 फूट (654.710 मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे.
सध्या धरणातील एकूण (Gross) पाणीसाठा 86.11 टीएमसी (81.81%) असून उपयुक्त (Live) पाणीसाठा 80.99 टीएमसी (80.88%) इतका झाला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासांत चांगला पाऊस झाला. कोयना येथे 121 मिमी, नवजा येथे 174 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान अनुक्रमे कोयना 2,895 मिमी, नवजा 3,509 मिमी आणि महाबळेश्वर 3,485 मिमी इतके आहे.
कोयना धरणात सध्या 25,005 क्युसेक (2.16 टीएमसी) पाण्याची आवक सुरू आहे. धरण व्यवस्थापनाकडून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलविद्युत प्रकल्प व धरणाच्या दरवाजांतून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
सध्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून 1,050 क्युसेक, तर धरणाच्या रेडियल गेटमधून 5,079 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असून एकूण विसर्ग 6,129 क्युसेक इतका आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.
कोयना धरणाची सद्यस्थिती (31 जुलै 2026 | सकाळी 8.00 वा.)
🔸पाणीपातळी : 2,148.00 फूट (654.710 मी.)
🔸एकूण पाणीसाठा : 86.11 टीएमसी (81.81%)
🔸उपयुक्त पाणीसाठा : 80.99 टीएमसी (80.88%)
🔸पाण्याची आवक : 25,005 क्युसेक (2.16 टीएमसी)
🔸जलविद्युत प्रकल्पातून विसर्ग : 1,050 क्युसेक
🔸रेडियल गेटमधून विसर्ग : 5,079 क्युसेक
🔸एकूण विसर्ग : 6,129 क्युसेक


सायंकाळी 5 नंतर विसर्ग वाढवला जाणार

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. 


कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि. ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुटावरून २ फुटापर्यंत उघडून १०,६३० क्युसेक  विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.


कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ११,६८० क्युसेक विसर्ग सुरू होईल.


तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो.


धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी,असे आवाहन कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांच्याकडून करण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖

#कोयनाधरण #कोयनाविसर्ग #कोयनानदी #कोयनानगर

#पाटण #कराड #सातारा #सांगली #पाऊस #पूर

#चांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंन्यूजपेपर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या