🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

प्रा.सौ.जयमाला साठे यांची लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड )च्या अध्यक्षपदी प्रा.सौ.जयमाला अमोल साठे (रा.म्हासोली ता.कराड) यांची एकमताने निवड करण्यात करण्यात आली आहे.
कराड येथे पत्रकार आणि समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदरची निवड करण्यात आली.

या बैठकीस समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, माजी अध्यक्ष दत्तात्रय भिसे (फौजी), रामभाऊ दाभाडे, रमेश सातपुते, गजानन सकट,आकाराम चव्हाण,श्रीकांत सातपुते,संतोष चव्हाण,राहुल वायदंडे,सुरज घोलप,अरूण कमाने,देवानंद कांबळे,परशुराम साठे,ॲड. राधा भोसले ,जयवंत सकटे ,अमित वायदंडे,दिलीप चव्हाण (आप्पा),सोमनाथ महापुरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे सचिव हरी बल्लाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.तर आभार कु.जाई प्रकाश यांनी मानले.

       महाराष्ट्रभर कौतुक


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्याच्या अध्यक्षपदी प्रथमच उच्चशिक्षित आणि मर्दानी खेळ, क्रिडा क्षेत्राशी निगडित महिलेची अध्यपदी झालेली निवड हाच महाराष्ट्रभर कौतुकाचा विषय ठरत आहे.

➖➖➖➖➖➖➖


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या