🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड दक्षिणमध्ये ५ सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांसाठी २.१६ कोटींचा निधी

 आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचा पाठपुरावा; जलयुक्त शिवारच्या कामांना मिळाली गती



चांगभलं प्रतिनिधी | कराड

 
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कासारशिरंबे, साळशिरंबे व तुळसण या गावातील ५ सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांच्या कामांना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या निधीमुळे संबंधित गावांमधील भूजल पातळी उंचावण्यास मदत होणार असून, त्याचा मोठा फायदा या भागातील शेतीला होणार आहे.

कराड दक्षिणमधील कासारशिरंबे, साळशिरंबे व तुळसण या गावांना दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येते. शिवाय शेतीसाठी पाण्याअभावी अनेक अडचणीही निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याची कामे मार्गी लावण्याची मागणी केली होती.

ग्रामस्थांची ही गरज ओळखून आ.डॉ. भोसले यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. याची दखल घेत मृदा व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार २.० अंतर्गत विविध ५ बंधाऱ्यांच्या कामासाठी एकूण २ कोटी १६ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. या माध्यमातून कारसारशिरंबे येथील सिमेंट काँक्रीट बंधारा क्र. ७ (४४.७९ लाख) आणि बंधारा क्र. ८ ( ₹४४.५९ लाख), तसेच साळशिरंबे सिमेंट काँक्रीट बंधारा क्र. १ (४४.०८ लाख) आणि तुळसण सिमेंट काँक्रीट बंधारा क्र. १ (४२.५६ लाख) व बंधारा क्र. २ (४०.३६ लाख) यांची कामे करण्यात येणार आहे.

या बंधाऱ्यांच्या कामांमुळे भूजल पुनर्भरणास चालना मिळणार आहे. तसेच विहिरी, बोअरवेल आणि ओढ्यांमधील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांना वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांमधून आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आणि भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖

#आमदारअतुलबाबाभोसले #कराडदक्षिण #बंधारेनिधी

#बंधारेदुरुस्ती #भाजप #कासारशिरंबे #साळशिरंबे #तुळसण

#चांगभलं #चांगभलंन्यूज #चांगभलंसाप्ताहिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या