हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
महाराष्ट्र सरकारने आदिवासी पारधी समाजाचे विकासाकरिता विशेष मोहीम राबविण्यात यावी,पारधी पुनर्वसनाचा जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करण्यात यावा,पारधी कुटुंबाना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे धर्तीवर भूसंपादन करण्यात येवून सदरच्या जमिनींचे वाटप पारधी कुटुंबाना करण्यात यावे तसेच पारधी समाजातील लोकांवर होणाऱ्या अन्यायास आळा बसवण्याकरीता त्वरित उपाययोजना करण्यात यावी यां मागण्यांसाठी पारधी मुक्ती आंदोलनाचे वतिने विधानसभा अधिवेशनावर मंगळवार दि.०७ जुलै २०२६ रोजी 'इशारा मोर्चा' चे आयोजन करण्यात आल्याची माहीती पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष आदिवासीसेवक प्रकाश वायदंडे,राज्य उपाध्यक्ष दलितमित्र सनातन भोसले,विभागीय अध्यक्ष अनिल कांबळे यांनी दिली आहे.
या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने पारधी समाजातील लोक उपस्थित राहणार आहेत. सदरचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हाध्यक्ष कैलास पवार,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख चान्सलर काळे,सांगली जिल्हा उपाध्यक्ष पाणेश पवार,यगदेश काळे (सातारा),संजय भोसले,तात्या पवार,गौडा भोसले,रणधीर पवार,धैर्यबाज काळे,शिवराज आवळे,आनंदराव भोसले, संतोष काळे सौ.छायाक्का भोसले आदि प्रयत्नशिल आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
#पारधीमुक्तीआंदोलन #पारधीसमाज #प्रकाशवायदंडे
#पारधीमोर्चा #चांगभलं #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंन्यूज
#चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं #Changbhala

0 टिप्पण्या