🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कोयना धरणाचे सहा दरवाजे ४ फुटांवर; सकाळी ९ वाजल्यापासून २४,९०८ क्युसेक विसर्ग सुरू

 



चांगभलं प्रतिनिधी | कोयनानगर | दि. ३ ऑगस्ट २०२६

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत असून, धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी (३ ऑगस्ट) सकाळी ९ वाजल्यापासून धरणाच्या सहा वक्र दरवाजांची उंची ५ फुटांवरून ४ फुटांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सांडव्यावरून होणारा विसर्ग २३,८५८ क्युसेक इतका करण्यात आला आहे.
कोयना पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यरत असून त्याद्वारे १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीपात्रात एकूण २४,९०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजेच्या आकडेवारीनुसार, कोयना धरणाची पाणीपातळी २१५२ फूट ९ इंच (६५६.१५८ मीटर) इतकी असून, धरणातील एकूण पाणीसाठा ९१.४२ टीएमसी (८६.८६ टक्के) आणि उपयुक्त पाणीसाठा ८६.३० टीएमसी (८६.१९ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.
धरणात सध्या ३३,२८४ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोयना परिसरात ४२ मिमी तर महाबळेश्वर येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील गावांनी, ग्राम प्रशासनाने व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सांडव्यावरील विसर्गात पुढील बदल करण्यात येऊ शकतात, असेही सिंचन विभागाने स्पष्ट केले आहे.


➖➖➖➖➖➖➖

#कोयनाधरण #कोयनाविसर्ग #कोयनानदी #KoynaDam

#पाटण #चांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं

#चांगभलंन्यूजपेपर #साताराजिल्हा #सांगलीजिल्हा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या