हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
कराड शहरातील शाहू चौक ते सर्किट हाऊस मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास अखेर प्रारंभ झाला आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी रस्त्याची पाहणी करून दिलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले आहे.
सर्किट हाऊसकडे जाणाऱ्या या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत पाहणी करताना आमदार डॉ. भोसले यांनी पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व नवीन कामासाठी राज्य सरकारकडून 69 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे पूर्णपणे नवीन काम हाती घेण्यात येणार आहे. तोपर्यंत खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, शासकीय विश्रामगृहाच्या संरक्षक भिंतीच्या डागडुजीबाबतही आमदार डॉ. भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आमदारांनी पाहणीवेळी दिलेला शब्द अल्पावधीतच पाळल्याने शाहू चौक–सर्किट हाऊस मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात झाली असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नगरसेवकांनी केली कामाची पाहणी....
दरम्यान, नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय वाटेगावकर , नगरसेवक शिवाजी पवार नगरसेवक आशुतोष डुबल यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
➖➖➖➖➖➖
#अतुलबाबाभोसले #कराडदक्षिण #शाहूचौकतेसर्किटहाऊसरस्ता #कराड #KaradCityNews #ChangbhalaNews #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंसाप्ताहिक




0 टिप्पण्या