🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

९२१ दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मदतीचा आधार!

 


आ. डॉ. अतुलबाबांच्या पुढाकारातून १७ सप्टेंबरला शिबिर; विविध साहित्याचे होणार मोफत वितरण

हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी पाचवड फाटा (ता. कराड) येथील आनंद मल्टिपर्पज हॉलमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी नि:शुल्क साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात तब्बल ९२१ पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते विविध सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग योजनेंतर्गत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकाराने दिनांक १ ते ३ जुलै दरम्यान कोयना वसाहत (ता. कराड) येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबीर घेण्यात आले. यापैकी ९२१ पात्र लाभार्थ्यांना आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे तब्बल ८०.७८ लाख रुपयांचे विविध सहाय्यभूत साहित्य मंजूर झाले आहे. यामध्ये व्हीलचेअर, व्हीलचेअर विथ कमोड, काठी, कानाचे मशीन, कंबर पट्टा, गुडघ्याचा पट्टा, नेक बेल्ट, स्मार्ट फोन, पाठीचा पट्टा, कमोड चेअर अशा साहित्याचा समावेश आहे.

या साहित्याचे नि:शुल्क वितरण पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी पाचवड फाटा येथील आनंद मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला येताना पात्र लाभार्थ्यांनी आपले मूळ आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.


➖➖➖➖➖➖

#अतुलबाबाभोसले #दिव्यांग #ज्येष्ठनागरिक #सुरेशबाबाभोसले #कृष्णाविश्वविद्यापीठ #पंतप्रधाननरेंद्रमोदी #चांगभलंन्यूजपेपर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या