कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीराचे आयोजन
चांगभलं प्रतिनिधी | कराड
कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शेरे स्टेशन येथील सद्गुरू प्राथमिक आश्रमशाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह परिसरातील ४५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती अनिता वेताळ, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका साळुंखे, पं. स. सदस्य वर्षा निकम, माधवी पाटसुपे, माजी सदस्य बाळासाहेब निकम, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव निकम, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, कृष्णा विश्व विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, जयवंत इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनंत गुजर, भाजपाचे मंडल अध्यक्ष शंकर निकम, शेरे गावच्या सरपंच मनिषा शिरतोडे, माजी सरपंच संगीता निकम, कृष्णा बँकेचे संचालक नारायण शिंगाडे, अधिकराव निकम, समीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांची विविध आजारांच्या अनुषंगाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान करण्यात आले. तसेच तपासणीदरम्यान आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय आयुष्मान भारत कार्ड तसेच वयोवृद्धांसाठी असलेल्या वयोवंदना कार्डासाठी मोफत नोंदणी करण्यात आली. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, विनायक भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वळसे येथील एहसास मतिमंद मुलांच्या वसतिगृहात मुलांसाठी जेवण, अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी दत्तात्रय गणेशकर, दिलीप जाधव, रोहित पिसाळ, रमेश मंदिरे, अभिजीत कराळे, विनायक जाधव यांची उपस्थिती होती.
➖➖➖➖➖


0 टिप्पण्या