चांगभलं प्रतिनिधी | पुणे
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून शैक्षणिक चळवळीला बळ देण्याचे कार्य अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराडच्या माध्यमातून होत आहे. ट्रस्टचे शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्य महान असून, हे कार्य बहुजन समाजाला निश्चितच दिशादर्शक ठरणारे आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड, पुणे येथील मा. आमदार शंकरभाऊ जगताप यांनी केले.
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करताना आमदार शंकरभाऊ जगताप बोलत होते.
यावेळी राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल रामराव वडकुते यांचा मानपत्र देऊन मा. आमदार शंकर भाऊ जगताप, रामहरी रुपनवर साहेब आणि प्रवीण काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. एम. एम. शिकारे, सदस्य महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, नारायण गलांडे, नगरसेवक पुणे महानगरपालिका, डॉ. सौ. दिपाली सूर्यवंशी, प्रशासकीय अधिकारी, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ पुणे, सचिन बुरुंगले, चेअरमन, हर्ष लॉजिस्टिक कंपनी, नवी मुंबई, डॉ. पंकज भिवटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, सुधीर वाघमोडे, उद्योजक, सूर्यकांत गोफणे, मा. नगरसेवक, पिंपरी-चिंचवड, पुणे, मुकेश कारवा, उद्योगपती, राहुल कोळपे, सहायक पोलीस निरीक्षक, पुणे, अजय दुधभाते, पिंपरी-चिंचवड, प्रवीण काकडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
“सन्मानामुळे आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाली”
राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर झालेल्या सत्काराला उत्तर देताना रामराव वडकुते यांनी हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. “या सत्कारामुळे मला आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. खासदार म्हणून काम करताना कुठेही कमी पडणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात झालेला हा मोठा सन्मान मी कदापि विसरणार नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी रामहरी रुपनवर आमदार यांनी विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महान थोर पुरुषांच्या आदर्श विचारांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अॅड. विजयराव पाळेकर, लोणावळा, पुणे यांना कामगारांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सतीश बुरुंगले, शेगाव, बुलढाणा यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘समाजभूषण’ पुरस्कार देण्यात आला.
डॉ. नानासाहेब राचकर, पुणे यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘उद्योग रत्न’ पुरस्कार, गजानन वाघमोडे, पिंपरी-चिंचवड, पुणे यांना सामाजिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल ‘मल्हार भूषण’ पुरस्कार आणि विजयराज पिसे, पुणे यांना सामाजिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘उद्योग भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुनील शेंडगे, पुणे यांना सामाजिक व उद्योग क्षेत्रासोबतच एकत्र कुटुंबपद्धतीची परंपरा जपल्याबद्दल ‘महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा’ पुरस्कार देण्यात आला. डॉ. विजय झोरे, कोरेगाव, सातारा यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘वैद्य रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजेश तांबवे, कोल्हापूर यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल ‘शिक्षण भूषण’ पुरस्कार, प्रा. डॉ. विठोबा तळे, पिंपरी-चिंचवड, पुणे यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शंकर वीरकर, सहायक अभियंता, म्हाडा, मुंबई यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल ‘वीर शिग्रोबा धनगर समाज सेवा’ पुरस्कार, उल्हास वाघमोडे, भूमी अभिलेख अधिकारी, मुंबई यांना ‘अहिल्या भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. रुक्मिणी गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे यांना नोकरी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘अहिल्या रत्न’ पुरस्कार, सोमनाथ कर्णवर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, ठाणे यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार आणि अश्विनी शेंडगे, डीवायएसपी, पुणे यांना ‘अहिल्या रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नवनाथ गोरड, सहाय्यक अभियंता, जलसंपदा, ठाणे यांना सामाजिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कृषी रत्न’ पुरस्कार, दीपक राहिज, पिंपरी-चिंचवड, पुणे यांना उद्योग, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल ‘मल्हार रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बापुसाहेब नरुटे यांना उद्योग, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘समाज रत्न शिवाजीराव शेंडगे समाजसेवा’ पुरस्कार देण्यात आला. प्रवीण कोळपे यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल ‘शिक्षण रत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
सौ. रतनबाई खंडु कोळपे व खंडु कोळपे, श्रीगोंदा यांना ‘आदर्श माता-पिता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मान्यवरांची मार्गदर्शक भाषणे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले. यावेळी नारायण गलांडे, डॉ. एम. एन. शिकारे, सुधीर वाघमोडे, डॉ. दिपाली सूर्यवंशी आणि डॉ. पंकज भिवटे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक आकाश पाटील यांनी केले, तर आभार प्रा. महावीर काळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. शितल काकडे, सौ. मनिषा डांगे, सौ. कल्याणी बुरुंगले, संतोष भानुसे, दिनेश शिंदे, अशोक शिंदे, डॉ. अजित राचकर, वसंतराव हिरवे, हिराकांत गाडेकर, संजय कवितके, सुनील बनसोडे, बाबुराव शेडगे, संतोष पांढरे, गणेश हजारे, नवनाथ देवकाते, शंकर दातीर, आदित्य वाघमोडे, तुकाराम कोकरे, प्रसाद लोले, तेजस शेंडगे, बाळासाहेब यमगर, सोमनाथ ओव्हाळ आणि अजित ताटे यांनी परिश्रम घेतले.
➖➖➖➖➖➖➖



0 टिप्पण्या