🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

रयत सहकारी साखर कारखान्याची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात ; कारखान्याच्या प्रगतीचा आढावा

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड

शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील रयत सहकारी साखर कारखान्याची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेस अथणी-रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख, प्रा. धनाजी काटकर, शामराव पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात आप्पासाहेब गरुड म्हणाले, रयत सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीमागे संस्थापक स्व. विलासराव पाटील (काका) यांचा शेतकरी हिताचा उद्देश होता. कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उद्देश यशस्वीपणे पुढे नेला जात आहे. आज रयत कारखाना शासकीय देणी वगळता पूर्णपणे कर्जमुक्त झाला आहे. कारखान्याची ५ हजार मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता तसेच वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला अधिक बळकटी मिळाली आहे.
अथणी-रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेताना सांगितले की, मागील गळीत हंगामात कारखान्याने ४ लाख ३८ हजार मे. टन ऊस गाळप केले. गाळपास आलेल्या उसाला तालुक्यात उच्चांकी प्रतिटन ३५०० रुपये एकरकमी दर देण्यात आला. यंदा ६ लाख मे. टनांपेक्षा अधिक गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. धनाजी काटकर यांनी मनोगत व्यक्त करताना स्व. विलासराव पाटील (काका) यांच्या आठवणींना उजाळा दिला. रयत कारखान्याची उभारणी होत असताना टीका करणाऱ्या मंडळींची आज तोंडे बंद झाली आहेत. स्व. काकांचे विचार आणि संस्थेच्या विकासाचा वारसा जपत कारखान्याने केलेली प्रगती ही त्याचीच फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेच्या प्रारंभी कारखान्याचे संस्थापक स्व. विलासराव पाटील (काका),यांच्या प्रतिमेस अभिवादन करणेत आले.उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार, कारखान्याचे माजी चेअरमन स्व. जयसिंगराव पाटील तसेच अहवाल सालात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेत विषयपत्रिकेचे वाचन शैलेश देशमुख यांनी केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. सभेचे प्रास्ताविक संचालक प्रदीप पाटील यांनी केले. अॅड. शंकरराव लोकरे यांचे मनोगत वाचून दाखविण्यात आले. आभार संचालक पंजाबराव देसाई यांनी मानले, तर सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले.
सभेस कारखान्याचे संचालक जयवंतराव मोहिते, बाजीराव शेवाळे, पी. बी. शिंदे, प्रशांत पाटील, अर्जुन पवार, आनंदराव पाटील, आत्माराम देसाई, शशिकांत साठे, जयवंतराव बोंद्रे, विजया माने, हिम्मत पाटील, जगन्नाथ माळी, किसनराव जाधव, तुकाराम पाटील यांच्यासह सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या