🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी अतुलबाबांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

 ‘ड्राय स्पेल’चा अहवाल सादर; मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीसांकडून मदतीची ग्वाही




चांगभलं प्रतिनिधी | कराड


कराड तालुक्यात पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक भागांत उभी पिके वाळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर कराड तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून, बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आमदार डॉ. भोसले यांनी मुंबईत मुख्यमंत्री ना. फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी निवेदनासोबत कराड तालुक्यातील पावसातील खंड अर्थात ‘ड्राय स्पेल’चा डेटा, तसेच कराडचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला दुष्काळी परिस्थितीचा अहवाल जोडत, कराड तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती अधिकृत आकडेवारीसह मुख्यमंत्र्यांसमोर विस्ताराने मांडली.

निवेदनात आ. डॉ. भोसले यांनी म्हटले आहे की, यंदा कराड तालुक्यात सोयाबीन आणि भुईमुगाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. त्यामुळे खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत पावसाने दीर्घकाळ दडी मारली. परिणामी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी उभी पिके वाळून गेली आहेत.

पावसातील या दीर्घ खंडाचा थेट परिणाम खरीप उत्पादनावर झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ‘ड्राय स्पेल’चा कालावधी, पिकांवर झालेला परिणाम आणि कराड तालुक्यातील एकूण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कराड तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. भोसले यांनी केली.

दरम्यान, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीची मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, पिक कापणी प्रयोगांच्या आधारे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनस्तरावरून मदत मिळण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.

➖➖➖➖➖➖

#कराडदक्षिण #अतुलबाबाभोसले #दुष्काळग्रस्ततालुके #चांगभलं #भाजप #शेतकरी #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या