![]() |
कराड, दि. १६ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपालिका निवडणुकीत आज (रविवार) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व यशवंत विकास आघाडीच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, यशवंत विकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले,
“महायुतीबाबत चर्चा सुरू आहेत. दोन दिवसांत आम्ही स्वबळावर लढणार की मित्रपक्षांसोबत, हे अधिकृतपणे जाहीर करू. शिवसेना व यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारही आज-उद्या अर्ज दाखल करतील.”
महायुतीत तणाव — नगराध्यक्ष पदावर दोन्ही बाजू ठाम...
कराड नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) ने चार दिवसांपूर्वीच राजेंद्रसिंह यादव यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली होती. त्यामुळे शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर कोणतीही तडजोड होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनीदेखील
“नगराध्यक्ष पदाबाबत कोणतीही तडजोड नाही” असा ठाम दावा व्यक्त केला होता. तरीही भाजपकडून महायुती संदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते. यावर आज भाष्य करताना यादव म्हणाले,
“चर्चा सुरू आहे. दोन दिवसात महायुतीबाबतची आमची अधिकृत भूमिका स्पष्ट करू.”
कराडच्या विकासासाठी 2056 चे व्हिजन....
यादव यांनी कराडच्या दीर्घकालीन विकास आराखड्याबाबतही महत्त्वाचे विधान केले.
ते म्हणाले —
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराजे देसाई व शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनानुसार अर्ज दाखल केला आहे. 2056 साली कराडची अंदाजे 3 लाख लोकसंख्या गृहीत धरून शहराचा मायक्रो विकास व्हिजन आम्ही मतदारांसमोर ठेवणार आहोत.”
#KaradNews #KaradMunicipalElection #ChangbhalaNews #RajendraSinghYadav #ShivsenaShinde #YashwantVikasAghadi #KaradPolitics #Mahayuti #BJP #KaradNagarsevak #MaharashtraPolitics
कराड नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातील शिवसेनेच्या मेळाव्यातील राजेंद्रसिंह यादव यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ नक्की पहा...👇


0 टिप्पण्या