मसूर - कराड | चांगभलं वृत्तसेवा
कराड उत्तर मतदार संघात एका वर्षात ७६० कोटीचा निधी आणला, ही वचनपूर्ती व वर्षपूर्तीची मतदार संघातील जनतेला भेट असून पाच वर्षात पाच हजार कोटीचा निधी आणणारच असा ठाम विश्वास व्यक्त करून मसूरच्या व्यापारी पेठेला जोडणाऱ्या जुन्या पुलासाठी येत्या अर्थसंकल्पात ३ ते ४ कोटी रु. मंजूर करून आणण्याबरोबरच इतर मागण्याही पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही देऊन, कराड उत्तरची इंच न इंच जमीन ओलिताखाली आणणारच, असे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केले.
मसूर येथील १ कोटी २३ लक्ष ६५ हजार रुपयांच्या मंजूर विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, माजी जि. प. सदस्य नंदकुमार जगदाळे, उद्यानपंडित दिनकराव पाटील, युवा नेते कुलदीप क्षिरसागर, पवन निकम, ओंकार जगदाळे, प्रशांत यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार घोरपडे पुढे म्हणाले, खासदारकी व आमदारकी जशी एक विचारांची झाली. तशी येऊ घातलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती एक विचारांची करून सर्वच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य निवडून आणणारच, कारण माझे सोबत जनता आहे. असा शब्द मी पक्षश्रेष्ठींना देतोय त्यामुळे सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्याची जबाबदारी तुम्हा मतदारांची आहे.
ते पुढे म्हणाले, गत ३५ ते ४० वर्षात हणबरवाडी धनगरवाडी योजना ऐकत होतो. पण एकाच वर्षात त्याला आपण गती दिली. पहिल्या टप्प्याचे पाणी लवकरच सुरू करतोय.
प्रास्ताविक पर भाषणात जयवंत जगदाळे यांनी ग्रामीण रुग्णालय, जुन्या बाजारपेठेत जोडणारा महत्वपूर्ण पूल तसेच बाजारपेठ ते स्मशानभूमी रस्ता व स्टेटलाईट व्हावी अशी मागणी केली. यावेळी दिनकरराव पाटील, उमेश साळुंखे, नंदकुमार जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ॲड. उदयसिंह जगदाळे, संजय शिरतोडे, सुनीलदादा दळवी, सुमित शहा, जितेंद्र मोरे, अण्णाजी यादव, रविंद्र यादव, संदीप सावंत, सचिन यादव, संभाजी इंगवले, सरपंच वैशाली माळी, पायल जाधव, धीरज जाधव, संभाजीराजे बर्गे, विश्वजीत जगदाळे, शिवाजीराव नांगरे- पाटील, राजन पाटील, गणेश घारगे, सुभाषराव पाटील, वामनराव साळुंखे, दिगंबर भिसे, प्रशांत घोलप, शरद घोलप उपस्थित होते.
प्रास्ताविक जयवंत जगदाळे यांनी केले. सूत्रसंचालन आशिष मोहिते यांनी केले. तर युवा नेते ओमकार जगदाळे यांनी आभार मानले
आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...
१. मसूर मध्ये रस्ता रुंदीकरणात एकही इमारत किंवा दुकान तोडले जाणार नाही.
२. शामगाव घाट हा महाराष्ट्रातील काँक्रिटीकरण रस्ता होणारा एकमेव घाट असेल.
३ मसूर परिसरात राष्ट्रवादी व काँग्रेसला दे धक्का. अनेक नेते व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. एकही दिवस असा गेला नाही की, राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश झाला नाही.
४. विरोधकांची गळती न थांबणारी आहे.
५. तुम्ही ४४ हजार मताचे लीड दिले. आता माझी जबाबदारी जुनी पाळे-मुळे काढून टाकायची.
६. जिल्हा परिषद व पंचायत समितीला एकास एक लढत होणारच.
७. एका वर्षात २१ जनता दरबाराच्या माध्यमातून ५ हजार प्रशासकीय विषय सोडवले. पाच वर्षात २५ हजार विषय निकाली काढणारच.
८. प्रशासन लोकाभिमुख करणार.
९. पाणी योजनेचे ८१ टक्के बिल सरकार भरणार. फक्त १९ टक्के पाण्याचे पैसे लाईट बिलाच्या स्वरूपात शेतकऱ्यांनी द्यायचे.
१०. लवकरात लवकर हणबरवाडी योजनेच्या पहिल्या टप्प्याचे पाणी देण्याचे नियोजन.
११. धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा सुरू करणार.
१२. तारळीचे पाणी जोडल्यापासून फोन येतात की ऊसतोड आहे, पाणी बंद करा.
१३. दोन वर्षात ११ पाणी योजनांसाठी ७०० ते ८०० कोटीचा निधी आणणारच.
१४. कराड उत्तर मधील इंच न इंच जमिनीला पाणी देणार * पाणी वाटप योजना व्यवस्थित चालवण्यासाठी प्रत्येक सोसायटीस ऑफिस बांधून देणार.
१५. 'रहिमतपूर नगरपालिकेत २१-० ने आपलाच विजय होईल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१६. माझ्यासोबत वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांबरोबरच तरुणांची प्रचंड मोठी फळी असून ही भविष्यातील यशाची नांदीच आहे.
राष्ट्रवादी व काँग्रेसला सोडचिठ्ठी...
मसूर गटातील विशेषत: वडोली भिकेश्वर गणातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कोणेगाव व कवठे गावातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी मसूरच्या कार्यक्रमात जाहीर भाजप प्रवेश केला, हा कार्यक्रम स्थळी मोठा चर्चेचा विषय ठरला होता.
मसूरकरांनी एकत्र निर्णय घ्यावा...
मसूर जिल्हा परिषद गटासाठी अनेक जण इच्छुक असले तरी सर्व मसूरकरांनी एकत्र बसून कोणा एकाला तिकीट द्यायची ते सांगावे. मात्र कोणी नाराज होऊ नका, कारण जिल्हा परिषद व पंचायत समितीला तीन-चार जणांना कॉप्ट करून घेता येणार आहे. त्यामुळे त्यांचाही सन्मान होईल, हे लक्षात घेऊन सर्वांनी एकजूट दाखवून एकच नाव सुचवावे.
#KaradNorth
#MasurNews
#ManojdadaGhorpade
#KaradVikas
#SataraPolitics
#MaharashtraDevelopment
#KaradNagarparishad
#MasurDevelopment
#KaradLatestNews
#ChangbhalaNews

0 टिप्पण्या