कराड प्रतिनिधी | २५ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी आज प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी भेट देत आदरांजली अर्पण केली. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आणि पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कपिल जगताप, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. भोसले तसेच निवडणूक शाखेचे सर्व पथकप्रमुख उपस्थित होते.
समाधीस्थळी उपस्थितांना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वशैलीचा आणि दूरदृष्टीचा उल्लेख करत, ग्रामीण उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. महाराष्ट्राच्या जनमानसात चव्हाण साहेब हे आदर्श नेते म्हणून कायम स्मरणात राहतील, असेही त्यांनी सांगितले.
#KaradNews #YashwantraoChavan #YBChavanSmrutiSthal #KaradAdministration #SataraNews #MaharashtraPolitics #Election2025 #KaradUpdates #ChangbhalaNews #Punyatithi #MaharashtraHistory #AdministrativeVisit #KaradLive #YBChavanTribute #KaradMunicipality

0 टिप्पण्या