कराड, प्रतिनिधी, २८ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कराडमधील सराईत व पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयीताला शिताफीने जेरबंद करत त्याच्याकडून एक अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण 66,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारीवर निर्बंध आणण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली.
26 नोव्हेंबर 2025 रोजी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार पेठ, दर्गा मोहल्ला शेजारील नाझ पानशॉप परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील संशयित आरोपी साद अश्पाक मुलाणी, वय 23 वर्षे, रा. आयेशा कॉम्प्लेक्स, रूम क्र. 16, आझाद चौक, शनिवारपेठ, कराड यास ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल (अग्नीशस्त्र) व एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, कराड उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम, हवालदार सतिश पाटील, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संदीप कुंभार, पोलीस शिपाई धिरज कोरडे, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, अमोल देशमुख, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, मुकेश मोरे आणि सोनाली पिसाळ यांच्या पथकाचा समावेश होता. कराड शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.
#KaradCrimeNews #KaradPolice #SataraPolice #GunSeizure #CrimeControl #ChangbhalaNews #KaradCity #PoliceAction #MaharashtraCrimeNews

0 टिप्पण्या