कराड , दि. १५ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
मलकापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने प्रभात फेरीचे आयोजन केले. हा उपक्रम प्रेमिलाताई चव्हाण कन्याशाळा, मलकापूरच्या मुख्याध्यापिका व विद्यार्थिनींच्या साह्याने राबवण्यात आला.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. त्यांनी नागरिकांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता उत्साहाने मतदान करून लोकशाही बळकट करावी, तसेच भयमुक्त वातावरणात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी, असे आवाहन केले.
स्वीपचे सहाय्यक मध्यवर्ती अधिकारी महेंद्र भोसले यांनी उपस्थितांना मतदान जागृतीसंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना मतदारांची शपथ घेऊन प्रभात फेरीचे यशस्वी आयोजन संपन्न झाले.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात स्वीप पथकाचे प्रमुख प्रतिभा लोंढे, सहाय्यक महेंद्र भोसले, प्रदीप बंडगर, गोविंद पवार, मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका करुणा शिर्के, सहाय्यक मतदान अधिकारी ज्ञानदेव साळुंखे, अभिजीत ढाणे, शाहीन मणेर, प्रथमेश देवकुळे, हसीनाबेगम मुल्ला, योगेश खराडे, मल्हारी शिरतोडे, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना मतदानासाठी जागरूक करून लोकशाही प्रक्रियेला सुरक्षित व विश्वासार्ह ठेवण्यासाठी आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
#मलकापूर #नगरपरिषद #मतदारजागृती #प्रभातफेरी #मतदान #लोकशाही #कराड #ChangbhalaNews #ElectionAwareness #VotingCampaign #SWEEP
मलकापूर नगरपालिका निवडणुकीशी संबंधित खालील बातम्या पहा आणि वाचा..

0 टिप्पण्या