🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडचे स्व.यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन लांबणीवर

 

कराड बाजार समिती संचालक मंडळ बैठक - कृषी प्रदर्शन 2025

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा महत्वपूर्ण निर्णय

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने प्रतिवर्षी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त दि.२४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान स्व.यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन, कृषी महोत्सव आयोजित करण्यात येतो.मात्र यावर्षी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर ऐवजी हे प्रदर्शन लांबणीवर पडणार आहे.


शुक्रवार दि.२१ रोजी सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे आणि विविध शासकीय विभाग यांची आढावा बैठक झाली.या जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सध्या सुरु असलेल्या नगरपालिका निवडणुका संपलेनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्याही निडणुका लागणेची शक्यता असलेने प्रदर्शनाची तारीख पुढील बैठक घेवून निश्चित करु असे सांगितले.

 
कराड येथे आयोजित होत असलेले प्रदर्शन राज्य भरातील शेतक-यांच्या भरघोस प्रतिसादामुळे अविरत सुरु आहे. प्रतीवर्षी लाखो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देवून आधुनिक शेती, तंत्रज्ञानाची माहिती घेत असतात. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,जि.प.कृषी व पशुसंवर्धन विभाग,महसूल व सहकार विभाग तसेच इतर विविध विभाग सहभागी होऊन शासकीय योजना शेतक-यांपर्यत पोहोचवत असतात परंतु यावर्षी नगरपालिका निवडणुका सुरु असून सर्व शासकीय यंत्रणा निवडणूक कामासाठी व्यस्त राहणार आहे.

 
प्रदर्शनाची पुढील नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर कळविणेत येईल याची सर्व शेतकरी बांधव, नागरिकांनी नोंद घ्यावी.असे आवाहन शेती उत्पन्न् बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या