🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

जयंत वाचनालयाकडून 'माणूस' घडविण्याचे काम ; देवराज पाटील

 

जयंत सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवराज पाटील – कासेगाव येथील कार्यक्रमाचा क्षण.

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

गेली २५ वर्षे जयंत वाचनालय करीत असलेले काम हे अतिशय प्रेरणादायी असून खऱ्या अर्थाने समाजामध्ये माणूस घडविण्याचे काम आपले हे वाचनालय करत असल्याचा सार्थ अभिमान आहे , असे गौरवोदगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी व्यक्त काढले.

कासेगांव येथील जयंत सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकारी व संचालक मंडळ निवडी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकारी, संचालक यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षपदी उदय पाटील यांची तर अविनाश तोडकर यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

देवराज पाटील पुढे म्हणाले की, जयंत वाचनालय ही सेवाभावी वृत्तीने काम करणारी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक आदर्शवत उपक्रम चालविले जातात. संस्थेच्या या उत्तुंग भरारीची यशोगाथा सर्वांसमोर आणावी. तसेच नूतन संचालकांनी अत्यंत जबाबदारीने काम करून या संस्थेचा नावलौकिक वाढवावा. वाचनालयाचे संस्थापक सचिन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये नूतन संचालकांना संस्थेच्या कामकाजाची माहिती देत संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रवासातील जुने पदाधिकारी व सेवकांचे योगदान व आठवणींना उजाळा दिला. कार्यवाह प्रा. कृष्णा मंडले यांनीही संस्थेच्या जडणघडणीचा आढावा घेत येणाऱ्या काळात सर्वांच्या सहकार्याने संस्थेचा संकल्प पूर्ण करणेचा मनोदय व्यक्त केला.

यावेळी कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील, सहकार्यवाह प्रा.जोतिराम माने, सल्लागार संचालक डॉ.अरुण शिंदे, आर.बी.पाटील सर, आर.डी. पाटील, निलिमा कुलकर्णी, नूतन संचालक रज्जाक मुल्ला, विठ्ठल पुजारी, वैभव मुळे, संदिप कांबळे, राजेंद्र पाटील, सुहास माळी, विजय औंधकर, जगन्नाथ वगरे,आशाराणी पाटील, सुनंदा देशमुख, दीपमाला भुते, अश्विनी रणदिवे, ग्रंथपाल सुरेखा तोडकर, सेवक दिनकर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संचालक अमोल मिसाळ सर यांनी व्यक्त मानले.


#JayantVachanalay #Kasegaon #WatharNews #SataraNews #KaradNews #LibraryMovement #NutanPadhadhikari #DevrajPatil #SharadPawarParty #ChangbhalaNews #PublicLibrary #SocialWork #VachanalayNews #EducationNews #LocalUpdates #MaharashtraNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या