कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराडचे सुपुत्र आणि जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी वीर माधवराव जाधव (दादा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि. १४ डिसेंबर रोजी सायं. ५ वा. कराड अर्बन को-ऑप. बँक शताब्दी सभागृहात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्य सैनिक माधवराव जाधव हे माजी नगरसेवक व उद्योजक स्व. दिलीप जाधव तथा पर्यावरण मित्र चंदू जाधव यांचे वडील होत.
या जन्मशताब्दी सोहळ्याला डॉ. वैशाली कडुकर, सुभाषराव जोशी, डॉ. सुभाष एरम, चैतन्य कणसे, समीर जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, या प्रसंगी स्वा. सै. वीर माधवराव जाधव यांच्या कार्यप्रवण जीवनपटावर आधारित विशेष चित्रफीत सादर केली जाणार आहे.
स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान अव्दितीय आणि प्रेरणादायी मानले जाते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी बजावलेली भूमिका तसेच स्वातंत्र्योत्तर काळात कराड व महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान मोलाचे आहे.
या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वातंत्र्य सेनानी वीर माधवराव जाधव जन्मशताब्दी संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाविषयीची माहिती त्यांचे नातू अमर जाधव, तनय जाधव, सून सुनिता दिलीप जाधव, तसेच एॅड. संभाजीराव मोहिते यांनी दिली.
#वीरमाधवरावजाधव #जन्मशताब्दीसोहळा #PrithvirajChavan #KaradNews #ChangbhalaNews #सातारान्यूज #स्वातंत्र्यसैनिक #KaradEvents #MaharashtraHistory #जाधवपरिवार


0 टिप्पण्या