कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत न्यायालयीन अपील दाखल झालेल्या प्रभाग १५ ब ची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्याचे मतदान आता शनिवार दि. २०/१२/२०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होत असून आज दि. ११ रोजी रिंगणातील उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या वतीने चिन्हे वाटप प्रक्रिया पार पडली.
निवडणूक रिंगणात उरलेल्या उमेदवारांपैकी विश्वनाथ फुटाणे यांना कमळ, अख्तरहुसेन आंबेकरी यांना छत्री, नईम पठाण यांना ब्रेड टोस्टर चिन्हे मिळाली असून या तिघांमध्ये लढत होणार आहे.
#KaradNews #ChangbhalaNews #KaradMunicipalElection #KaradNagarParishad #Prabhag15B #KaradLive #SataraNews #MaharashtraPolitics #Election2025 #KaradUpdates #Nivadnuk2025 #KaradCity #LocalNewsKarad #MarathiNews

0 टिप्पण्या