🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा बँकेच्या ३ नव्या शाखांचे उद्‌घाटन उत्साहात

 

मुंढे : कृष्णा सहकारी बँकेच्या नूतन शाखेचे उद्‌घाटन करताना कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले. बाजूस मान्यवर.

कराड, वाळवा व शिराळा तालुक्यात एकाच दिवशी शाखांना प्रारंभ

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
ग्रामीण शेतकर्‍यांची हक्काची बँक म्हणून ओळख असणार्‍या कृष्णा सहकारी बँकेच्या ३ नव्या शाखांचे उद्‌घाटन उत्साहात करण्यात आले. कराड तालुक्यातील मुंढे, वाळवा तालुक्यातील कासेगाव आणि शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे एकाच दिवशी शाखांना प्रारंभ करुन कृष्णा बँकेने ग्राहकाभिमुख सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते मुंढे येथे बँकेच्या २६ व्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, कृष्णा बँकेने नेहमीच सर्वसामान्य जनतेचे आर्थिक हित जपले आहे. खातेदार, ग्राहक व ठेवीदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच कृष्णा बँकेने बँकिंग क्षेत्रात नावलौकिक कमाविला आहे. बँकेने डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य दिले असून, त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहे.

 




शेडगेवाडी येथे बँकेच्या २५ व्या शाखेचे शाखेचे उद्‌घाटन जि. प. सदस्या साईतेजस्वी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कृष्णा बँक ही सहकार क्षेत्रातील एक आदर्श व विश्वासार्ह बँक असून, ती सभासद, संचालक व सेवक या तीन घटकांच्या समन्वयातून सक्षमपणे कार्यरत आहेत. नव्या शाखेमुळे शेडगेवाडी परिसरातील नागरिकांना सुलभ बँकींग सेवा मिळणार असून, स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे साईतेजस्वी देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, कासेगाव येथे ज्येष्ठ नेते ॲड. बी. डी. पाटील यांच्या हस्ते व कुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेच्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला कृष्णा कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, संचालक लिंबाजी पाटील, दीपक पाटील, जि.प. सदस्य सौ. प्रियांका साळुंखे, सौ. शैलजा शिंदे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दिलीपराव चव्हाण, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत कापसे, आर. टी. स्वामी, प्रमोद पाटील, उपसरपंच सागर पाटील, रमेश लवटे, माणिकराव पाटील, संतोष माने, हरिश्चंद्र पाटील, बाजीराव शेडगे, तानाजी वनारे, सरपंच तानाजी नाटुलकर, उपसरपंच मारुती शेडगे, दिनकर शेडगे, पंकज पाटील, रवी शेडगे, विकास शेडगे, तानाजी मोरे, संजय पाटील, रामभाऊ माळी, राहुल पाटील, प्रदीप माने, डॉ. तुळशीदास पाटील, विजय पाटील, मोहन पाटील, शंकर पाटील यांच्यासह बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, विजय जगताप, प्रमोद पाटील, रणजीत लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांच्यासह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, कर्मचारी, ग्राहक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



पहिल्याच दिवशी ९ कोटींच्या ठेवी

कृष्णा सहकारी बँकेच्या ३ नव्या शाखांचे उद्‌घाटन एकाच दिवशी कराड, वाळवा व शिराळा तालुक्यात करण्यात आले. बँकेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ९ कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी ठेवत, ग्राहकांनी बँकेवर आपला अतूट विश्वास दाखविल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या