🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

तीन जिल्ह्यांत व दोन राज्यात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

 कराड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कामगिरी




कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात घरफोड्यांच्या मालिकेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असताना कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत सराईत गुन्हेगारास जेरबंद केले आहे. या कारवाईत संशयीत आरोपीकडून सुमारे १५ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एप्रिल २०२६ च्या सुरुवातीला कराड शहर पोलिस ठाणे हद्दीत मलकापूर व सैदापूर परिसरात घरफोडीचे गुन्हे घडले होते. या घटनांची गंभीर दखल घेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, कराडच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली.

यावेळी कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करत सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेला सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यानंतर कराड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे सदर घरफोड्यांच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान लोकेश रावसाहेब सुतार (रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) या संशयीतास गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आणि गुन्ह्याची उकल झाली.
पोलिसांनी संशयिताकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच घरफोडीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी असा एकूण १५ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून करण्यात आली. कराड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


कारवाई करणारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक....


कारवाईत करणाऱ्या कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम यांच्यासह हवालदार सतीश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, धिरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, सोनाली पिसाळ यांचा समावेश होता.


संशयित सराईत ; दोन राज्यात २० गुन्हे...

पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेला संशयित लोकेश सुतार हा सराईत आहे. तो सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचा रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध सातारा, सांगली, कोल्हापूर या महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यासह व कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात मिळून जवळपास २० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे. या गुन्ह्यात त्याच्या आणखी कोण साथीदार आहेत काय? गुन्हा करण्याची पद्धत कशी होती? गुन्ह्यातील ऐवजाची विल्हेवाट कशी लावली जात होती? याबाबतचा सखोल तपास पोलिसांना करावा लागणार आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #KaradCrimeNews #SataraPolice

#CrimeNews #BrakingNews #SangaliNews

#KarnatakaCrimeNews #ChangbhalaNews

#KaradCity #चांगभलंन्यूज #Chngbhala

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या