🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

भाजपा पिंपरी चिंचवड प्रभारीपदी भरत पाटील यांची नियुक्ती

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले अभिनंदन




कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक (स्वतंत्र कार्यभार) ऍड. भरत पाटील यांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड ( पुणे जिल्हा) प्रभारीपदी निवड जाहीर केली असून या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ऍड. भरत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
भरत पाटील हे गेले 30 वर्षाहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांनी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून अत्यंत चांगले काम केले आहे. भरत पाटील हे सध्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक (भारत सरकार ) म्हणून काम करीत असून भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर गुजरात, राजस्थान, गोवा, दिल्ली येथील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी भरत पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यामुळे पक्षाने आता त्यांच्यावर पिंपरी चिंचवड प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे.
पिंपरी चिंचवड येथील संघटनात्मक पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे मत ऍड. भरत पाटील यांनी या नियुक्तीनंतर बोलताना व्यक्त केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #PimperiChinchwad #SataraNews

#BjpNews #Politics #Pune #ChangbhalaNews

#चांगभलंन्यूज #चांगभलं 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या