कराड, दि. १२ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज तिसऱ्या दिवशी बुधवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. काल म्हणजे मंगळवारी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर बुधवारी दिवसा अखेर अन्य एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
दरम्यान, मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षांच्या वाटाघाटी सुरू आहेत. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने या अगोदरच मलकापूर नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुढच्या एक-दोन दिवसात विविध पक्ष व आघाड्यांकडून उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे.
#MalakapurElection2025 #KaradPolitics #SataraNews #ChangbhalaNews #MalakapurNagarparishad #KaradTaluka #SataraDistrict #PoliticalUpdate #MaharashtraPolitics #LocalBodyElection #मलकापूरनगरपालिका #कराडनिवडणूक #साताराबातम्या #चांगभलान्यूज #भाजपनिवडणूक #राष्ट्रवादीकाँग्रेस #शिवसेना #कॉंग्रेस #मलकापूरराजकारण

0 टिप्पण्या