🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मलकापूर नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुनंदा साठे ; नगरसेवक पदासाठी मनोहर शिंदे यांच्या सह १५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे उमेदवार व कार्यकर्ते.


कराड, दि. १३ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी १ आणि विविध प्रभागांतून नगरसेवक पदासाठी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.


भाजपकडून नगराध्यक्षपदाचा एक आणि नगरसेवक पदांसाठी एकूण १३ उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह अनेक अनुभवी चेहऱ्यांचा समावेश आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून एक, तसेच नितीन उर्फ नारायण विष्णुपंत काशीद पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुनंदा तानाजी साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दाखल झालेल्या इतर उमेदवारी अर्जांची यादी पुढीलप्रमाणे —
प्रभाग ११ : मधून मनोहर भास्करराव शिंदे, राजश्री नितीन जगताप
प्रभाग १० : मधून वसीम शब्बीर मुल्ला (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
प्रभाग ८ :मधून गीता नंदकुमार साठे (अनुसूचित जाती प्रवर्ग)
प्रभाग ७ :मधून संभाजी मारुती रैनाक
प्रभाग ५ : मधून तानाजी संभाजीराव देशमुख, राजेंद्र प्रल्हाद यादव
प्रभाग ४ :मधून कल्पना नारायण रैनाक, सचिन संपत खैरे (अनुसूचित जाती प्रवर्ग)
प्रभाग ३ : मधून रंजना अशोक पाचुंदकर
प्रभाग २ : मधून गीतांजली शहाजी पाटील, विक्रम अशोक चव्हाण
प्रभाग १ : मधून शहाजी आनंदराव पाटील

तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून —
प्रभाग ५ :मधून मधुकर महादेव शेलार यांनी
तर अपक्ष उमेदवार म्हणून —
प्रभाग १ : मधून नितीन उर्फ नारायण विष्णुपंत काशीद पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,

अशी माहिती मलकापूर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कपिल जगताप व सहाय्यक ज्ञानदेव साळुंखे यांच्याकडून देण्यात आली.

दरम्यान, नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदासाठी झालेल्या या अर्जभरणीमुळे मलकापूर नगरपरिषद निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.

#मलकापूरनिवडणूक #नगराध्यक्षपद #भाजप #सुनंदासाठे #मनोहरशिंदे #शिवसेना #नितीनकाशीद #कराडराजकारण #SataraNews #ChangbhalaNews #MalkapurMunicipalElection #KaradPolitics

हेही वाचा  निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने दंड थोपटले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या